अस्तित्वाची लढाई
शिवबा सारखा पुत्र जन्मावा अशी सर्वांची आस
मग जिजाऊ जन्मली म्हणून का करता त्रास
स्त्री - पुरुष समानतेची नुसतीच बढाई
का ? नेहमी माझ्याच वाट्याला अस्तित्वाची लढाई
असं म्हणतात मुलगी म्हणजे आई - वडिलांचे नाक
पण असतो का यांचा वंशाच्या दिव्यावर धाक
कोणी समजून घेईल का माझ्या उत्पत्तीची कहाणी
का ? विसरतो समाज स्त्री अस्तित्वाची निशाणी
राब-राब राबले तरी सासरच्यांचा नजरेत नेहमीच कमीपणा
स्त्री अवहेलना करताना उंचच उंच यांच्या माना
स्त्रीला तूच्छ लेखून कसली समजतात शान
का ? लक्षात येत नसेल बरं माझ्या अस्तिस्त्वाचं भान
स्त्रीवर नेहमीच रूढी - परंपरांची पगडी
२१ व्या शतकातील पोकळ समाजव्यवस्था उघडी
स्त्री शक्तीच्या जाणिवतेचा घ्यावा लागणार धडा
का ? मीच द्यायचा माझ्या अस्तित्वाचा लढा
नेहमी केल्या जातात स्त्रीकडून न संपणाऱ्या अपेक्षा
अजूनसुद्धा द्यावी लागते पवित्रतेचे अग्निपरीक्षा
किती काळ पटवून द्यावी लागणार स्त्रीची गाथा
का ? कोणी समजून घेत नाही माझ्या अस्तित्वाची व्यथा
स्त्री - पुरुष समानतेची नुसतीच बढाई
का ? नेहमी माझ्याच वाट्याला अस्तित्वाची लढाई
- निरंजन हिंदुराव जाधव

Nice 👌
ReplyDeleteThanks 🙏
DeleteExcellent 👍👌
ReplyDeleteThanks🙏
DeleteNice 👍🏼
ReplyDeleteThanks🙏
DeleteVery nice.... 👌🏻👌🏻
ReplyDeleteThanks🙏
DeleteVery nice👍 wel done
ReplyDeleteThanks
Deleteखूप छान कविता
ReplyDeleteThanks
Delete