अस्तित्वाची लढाई
शिवबा सारखा पुत्र जन्मावा अशी सर्वांची आस मग जिजाऊ जन्मली म्हणून का करता त्रास स्त्री - पुरुष समानतेची नुसतीच बढाई का ? नेहमी माझ्याच वाट्याला अस्तित्वाची लढाई असं म्हणतात मुलगी म्हणजे आई - वडिलांचे नाक पण असतो का यांचा वंशाच्या दिव्यावर धाक कोणी समजून घेईल का माझ्या उत्पत्तीची कहाणी का ? विसरतो समाज स्त्री अस्तित्वाची निशाणी राब-राब राबले तरी सासरच्यांचा नजरेत नेहमीच कमीपणा स्त्री अवहेलना करताना उंचच उंच यांच्या माना स्त्रीला तूच्छ लेखून कसली समजतात शान का ? लक्षात येत नसेल बरं माझ्या अस्तिस्त्वाचं भान स्त्रीवर नेहमीच रूढी - परंपरांची पगडी २१ व्या शतकातील पोकळ समाजव्यवस्था उघडी स्त्री शक्तीच्या जाणिवतेचा घ्यावा लागणार धडा का ? मीच द्यायचा माझ्या अस्तित्वाचा लढा नेहमी केल्या जातात स्त्रीकडून न संपणाऱ्या अपेक्षा अजूनसुद्धा द्यावी लागते पवित्रतेचे अग्निपरीक्षा किती काळ पटवून द्यावी लागणार स्त्रीची गाथा का ? कोणी समजून घेत न...