तर कुणी म्हणे पाऊस
कुणी म्हणे वर्षा , तर कुणी म्हणे पावसाळा तर कुणी म्हणे पाऊस लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ओलंचिंब व्हायची फार हौस सरी तुझ्या कोसळती धर्तीवर आणि घाली थैमान जणू काही तू क्षमवत आहेस तिची तहान तुझ्या चाहुलीने मयूरही मोरपंख पसरी जलधारा तुझ्या करी धरणी मातेला हसरी रिम-झीम सरी जणू करी संगीताचे कृत्य तुझ्या आगमनाने पहायला मिळे निसर्गाचे नृत्य काय बोलावे तुला तूच निसर्गाचा सखा कृषीराजाचा तूच तरं खरा पाठीराखा श्रावनधारा तुझ्या जणू निसर्गाचा सोहळा बळीराजा पाहे वाट तुझी लावूनी वाटेवर डोळा समानतेचे घ्यावे तुझ्याकडून सर्वानीच धडे गरीब - श्रीमंत , लहान - मोठा , काळा - गोरा भेदभाव नाही फक्त तुझ्याकडे प्रेमाने बरसतोस तेव्हा सर्वाना वाटतोस हवा हवा पण रौद्ररूप पहिले राग येतो तुला जेव्हा जेव्हा कधी कधी कठोर होऊन दाखवतोस तुझा कोप विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट उडवतोस तू साऱ्यांचीच झोप किती सहन करतील लोक तप्त उन्हाचे...