माझं मन तिला कधी कळलंच नाही...



मृगनयनी तिचे डोळे पाहून काळजाचा ठोका माझ्या चुकला

पहिल्याच भेटीत प्रेम व्यक्त करायचा चान्स माझा हुकला

गालावर तिच्या केसांची बट पाहून माझा तोल मी घसरलो

तीच सौंदर्य पाहता पाहता मी स्वतःलाच विसरलो

आठवण येते तिची मला ठायी ठायी

पण माझं मन तिला कधी कळलंच नाही...

 

 

कितीही वेळ झाला तरी मी वाट बघत होतो तिच्या येण्याची

काहीच कारण नसताना मनात उत्सुकता तिला भेटण्याची

तिच्या गोड हसण्याचा जणू लागला होता मला लळा

नेहमी तिच स्मित हास्य पाहणं हाच माझा चाळा

समोर ती असते तेव्हा मला सुचतच नाही काही

पण माझं मन तिला कधी कळलंच नाही... 

 

 

श्रुंगार तो तिचा, काय तो रुबाब आणि तोरा

सौंदर्याने परिपूर्ण अशी जणू स्वर्गातील अप्सरा

मध सुद्धा फिका पडेल इतकी आवाजात तिच्या गोडी

माझं नेहमी एकच मागणं देवा बनाव आम्हां दोघांची जोडी

माझं गिडगिडन ऐकून असेल वैतागला देवासारखा देव तोही

पण माझं मन तिला कधी कळलंच नाही...

 

 

काळजी तिला माझी हि नेहमीच असायची

पण मला ते कळत नाही असं समजून स्वतःच फसायची

जेव्हा भेटायची तेव्हा मला ती एकटक पहायची

माझ्याबद्दल मनातील चुळबुळ मात्र लपवायची

नेमकं काय आहे तिच्या मनात हि चिंता मला खाई

पण माझं मन तिला कधी कळलंच नाही...

 


नंबर मिळावा तिचा म्हणून तिच्यामागे खूप फिरलो

कस कुणास ठाऊक पण मी तिच्यासाठी झुरलो

पहिला स्पर्शाने तिच्या जणू वेड मला लागले

मुलीचा स्पर्श काय असतो हे सुख तेव्हा मी भोगले

उन्हातान्हात तिची वाट पाहत होत होती अंगाची लाही

पण माझं मन तिला कधी कळलंच नाही...

 

 

मैत्री आमची दृढ इतकी बनली आयुष्याचा हिस्सा

शाई सुद्धा संपून जाईल जेव्हा लिहायला बसू तो किस्सा

राग तिचा इतका जणू काही मेघच गडगडले

एकतर्फी प्रेमाचे पितळ उघडे पडले

बंद झाली ती भेटायची, का ? ते समजेना काही

पण माझं मन तिला कधी कळलंच नाही...

 

 

विरहाने तिच्या मी वेडा पिसा झालो

तिच्या प्रेमळ आठवणीत शून्यात वाहून गेलो

अचानक फोन करून विसर मला बोलून रड रड रडली

मुर्खा तुझ्यामुळे सगळं झालं वर मलाच बडबडली

आजही डोळ्यात अश्रू घेऊन फिरतोय दिशा दाही

पण माझं मन तिला कधी कळलंच नाही...

 

 

आजही तिला आठवले तर तहान भूक हरवून जातो

परत येईल का ती या आशेनं मोठं मोठ्याने गातो

आठवत असेल का ती पण मला हेच विचार ध्यानी मनी

पण माझ्या हृदयातील तीच स्थान अजून घेतलं नाही कुणी

आयुष्य जरी सुरु असल तरी काळजाला ओढ तिचीच राही 

कुणास ठाऊक पण का?  माझं मन तिला कधी कळलंच नाही...

                

    कू. निरंजन हिंदुराव जाधव 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

बापाचं मोल काय असत आज मला कळालं...

अस्तित्वाची लढाई

सांग ना गं आई...