बापाचं मोल काय असत आज मला कळालं...
काय केलं माझ्यासाठी हे बोलून मी चुकलो त्याच क्षणापासून मी बाप-लेकाच्या नात्यास मुकलो त्याच्या डोळ्यातील अश्रूंनी मला उत्तर मिळालं बापाचं मोल काय असत आज मला कळालं... आपल्या स्वप्नांची मात्र करून होळी करत होता तो साजरी कुटुंबाची दिवाळी तारुण्य त्याच साऱ्या गरजांनी गिळाल बापाचं मोल काय असत आज मला कळालं... सर्वाना आनंदी ठेवायचं हाच हेतू मनीं कुटुंबाच्या सुखासाठी करत राहिला रक्ताचं पाणी काबाडकष्ट पाहून त्याच सुख माग वळाल बापाचं मोल काय असत आज मला कळालं... त्याची विचारपूस कराय देखील मला वेळ नसायचा पैसे मिळवण्यासाठी मात्र तो वन वन फिरत असायचा उन्हात तान्हात काम करून त्याच कातडं जळालं बापाचं मोल काय असत आज मला कळालं... स्वतः कपडे घ्यालायचा जुनी आणि साधी मला मात्र त्याची झळ बसू दिली नाही कधी समोर बाप उभा पाहून दुःख लांब पळालं बापाचं मोल काय असत आज मला कळालं... आम्हाला भरपेट खाऊ घालून स्वतः मात्र उपाशीपोटी आमच्या हसऱ्या चेहऱ्यासमोर ती गोष्ट त्याला छोटी बाप माझ्या पाठीशी खंबीर उभा राहायचा काळजी करू नको मी आहे असं नेहमी म्हणायचा त्याच आणि सुखाचं एकमे...