काय केलं माझ्यासाठी हे बोलून मी चुकलो त्याच क्षणापासून मी बाप-लेकाच्या नात्यास मुकलो त्याच्या डोळ्यातील अश्रूंनी मला उत्तर मिळालं बापाचं मोल काय असत आज मला कळालं... आपल्या स्वप्नांची मात्र करून होळी करत होता तो साजरी कुटुंबाची दिवाळी तारुण्य त्याच साऱ्या गरजांनी गिळाल बापाचं मोल काय असत आज मला कळालं... सर्वाना आनंदी ठेवायचं हाच हेतू मनीं कुटुंबाच्या सुखासाठी करत राहिला रक्ताचं पाणी काबाडकष्ट पाहून त्याच सुख माग वळाल बापाचं मोल काय असत आज मला कळालं... त्याची विचारपूस कराय देखील मला वेळ नसायचा पैसे मिळवण्यासाठी मात्र तो वन वन फिरत असायचा उन्हात तान्हात काम करून त्याच कातडं जळालं बापाचं मोल काय असत आज मला कळालं... स्वतः कपडे घ्यालायचा जुनी आणि साधी मला मात्र त्याची झळ बसू दिली नाही कधी समोर बाप उभा पाहून दुःख लांब पळालं बापाचं मोल काय असत आज मला कळालं... आम्हाला भरपेट खाऊ घालून स्वतः मात्र उपाशीपोटी आमच्या हसऱ्या चेहऱ्यासमोर ती गोष्ट त्याला छोटी बाप माझ्या पाठीशी खंबीर उभा राहायचा काळजी करू नको मी आहे असं नेहमी म्हणायचा त्याच आणि सुखाचं एकमे...
शिवबा सारखा पुत्र जन्मावा अशी सर्वांची आस मग जिजाऊ जन्मली म्हणून का करता त्रास स्त्री - पुरुष समानतेची नुसतीच बढाई का ? नेहमी माझ्याच वाट्याला अस्तित्वाची लढाई असं म्हणतात मुलगी म्हणजे आई - वडिलांचे नाक पण असतो का यांचा वंशाच्या दिव्यावर धाक कोणी समजून घेईल का माझ्या उत्पत्तीची कहाणी का ? विसरतो समाज स्त्री अस्तित्वाची निशाणी राब-राब राबले तरी सासरच्यांचा नजरेत नेहमीच कमीपणा स्त्री अवहेलना करताना उंचच उंच यांच्या माना स्त्रीला तूच्छ लेखून कसली समजतात शान का ? लक्षात येत नसेल बरं माझ्या अस्तिस्त्वाचं भान स्त्रीवर नेहमीच रूढी - परंपरांची पगडी २१ व्या शतकातील पोकळ समाजव्यवस्था उघडी स्त्री शक्तीच्या जाणिवतेचा घ्यावा लागणार धडा का ? मीच द्यायचा माझ्या अस्तित्वाचा लढा नेहमी केल्या जातात स्त्रीकडून न संपणाऱ्या अपेक्षा अजूनसुद्धा द्यावी लागते पवित्रतेचे अग्निपरीक्षा किती काळ पटवून द्यावी लागणार स्त्रीची गाथा का ? कोणी समजून घेत न...
सांग ना गं आई कधी करायची आपण दिवाळी... पिंकी, मनू, सोमू, राणी यांना शाळेला सुट्टी मिळाली म्हणजेच, आई आली बघ दिवाळी कॉलनीतील मुलांना त्यांचे पालक घेतात दरवर्षी नव - नवीन कपडे मग आम्हालाच का ठिगळे शिवलेले तुकडे आम्हाला पाहून मुले करतात तोंड वाकडे ते पाहून लागत खूप जिव्हाळी सांग ना गं आई कधी करायची आपण दिवाळी... शेजारील बंगल्यातून बघ सुटलाय करंज्या, लाडू, चिवड्याचा वास आपण हे सगळं कधी करणार हीच आमची आस येईल का गं आपल्याला फराळाची थाळी सांग ना गं आई कधी करायची आपण दिवाळी... सुगंधी उटणे, वासाचा साबणाचा सुटलाय घमघमाट लाईटींग ने सजले बंगले, काय तो त्यांचा थाट रंगबेरंगी, निरनिराळ्या फटाकड्या उडती कशा आम्हाला पण मिळतील उडवायला हीच खुळी आशा सणादिवशी तुझ्या अंगावर नेहमी फाटकीच चोळी सांग ना गं आई कधी करायची आपण दिवाळी... - निरंजन हिंदुराव जाधव
Very nice
ReplyDeleteThanks
Delete