सांग ना गं आई...
सांग ना गं आई
कधी करायची आपण दिवाळी...
पिंकी, मनू, सोमू, राणी
यांना शाळेला सुट्टी मिळाली
म्हणजेच, आई आली बघ दिवाळी
कॉलनीतील मुलांना त्यांचे पालक
घेतात दरवर्षी नव - नवीन कपडे
मग आम्हालाच का ठिगळे शिवलेले तुकडे
आम्हाला पाहून मुले करतात तोंड वाकडे
ते पाहून लागत खूप जिव्हाळी
सांग ना गं आई
कधी करायची आपण दिवाळी...
शेजारील बंगल्यातून बघ सुटलाय
करंज्या, लाडू, चिवड्याचा वास
आपण हे सगळं कधी करणार
हीच आमची आस
येईल का गं आपल्याला फराळाची थाळी
सांग ना गं आई
कधी करायची आपण दिवाळी...
सुगंधी उटणे, वासाचा साबणाचा सुटलाय घमघमाट
लाईटींग ने सजले बंगले, काय तो त्यांचा थाट
रंगबेरंगी, निरनिराळ्या फटाकड्या उडती कशा
आम्हाला पण मिळतील उडवायला हीच खुळी आशा
सणादिवशी तुझ्या अंगावर नेहमी फाटकीच चोळी
सांग ना गं आई
कधी करायची आपण दिवाळी...
- निरंजन हिंदुराव जाधव

Mastach👌👌
ReplyDeleteKhup mast
ReplyDeleteThanks
DeleteThank you
ReplyDeletebahot hard
ReplyDeleteThanks
DeleteNice👍👌
ReplyDeleteThanks
Delete